काय आहे WannaCry Ransomware ?


     आतापर्यंत आपण सगळ्यांनी WannaCry Ransomware बद्दल ऐकलंच असेल, आणि विचार करत असाल कि काय चाललंय हे, कोण करतंय हे, आणि तुमचा कंप्युटर सुरक्षित आहे का यांपासून, ज्याने एका आठवड्यात 20,000 PCs ना Hack केलंय.

काय आहे WannaCry Ransomware ?
     Wannacry Ransomware ज्याला आपण Wanna Decryptor च्या नावाने देखील ओळखतो. हा हल्ला SMB Exploit चा फायदा घेतो, ज्याला EternalBlue असं नाव दिलं आहे. ज्या मध्ये दूर बसलेला hacker Unpatched Microsoft Windows Operating System वर चालणाऱ्या कंप्युटर्स ना hack करतो.
एकदा का PCs मध्ये या Ransomware चा प्रवेश झाला की नंतर Local Networks ला Connect असलेल्या अन्य Unpatched PCs ना तो Scan करतो, त्याचबरोबर World Wide Internet वर Random Host lq देखील Scan करतो, त्यामुळे त्याला पसरायला वेळ लागत नाही.

हे हल्ले संपले का ?
अजिबात नाही !
       हि तर फक्त सुरुवात आहे . आत्ताच Security Researchers ने Ransomware च्या अन्य नवीन Version बद्दल माहिती शोधून काढली आहे. ज्याला WannaCry 2.0 असं नाव दिलं आहे, जो कदाचित कधी हि न थांबणारा आहे.
      या Ransomware ने प्रथम स्पेन, ब्रिटन, चीन आणि भारतासोबत अन्य काही देशांमध्ये High Profile Organizations ला प्रभावित केलं. या मध्ये U. K.चे Clinics आणि hospitals, Telecom, Gas, Electricity सुद्धा सामील आहेत. चीन मध्ये काही Universities सुद्धा सामील आहेत. 

WannaCry Ransomware कसा काम करतो ?
       हल्ला तेव्हा होतो जेव्हा System SMB Services चा उपयोग करून Network ला Connect असतो. या Services वर EternalBlue द्वारा हल्ला केला जातो आणि WannaCry Ransomware ला System वर सोडलं जातं. त्यानंतर System वर असलेला सगळं Data Encrypt करून ".WNCRY" Extension मध्ये बदलला जातो. 
  Successfull Exploitation नंतर , हे WannaDecryptor@.exe, tasksche.exe, taskdl.exe आणि taskse.exe सारख्या Files ना System वर Add करतो.
    Successfull Encryption नंतर , या Files Recover करण्यासाठी Warning Message दाखवतो, ज्यामध्ये  Files Recover करण्यासाठीच्या Instruction असतात. त्याबरोबरच एक Countdown Timer ला आतंक पसरवण्यासाठी दाखवला जातो, कारण User त्यांच्याद्वारे मागितलेली रक्कम लवकरात लवकर Payment करेल.

WannaCry Ransomware पासून कसं सुरक्षित राहणारं ?
√ सगळ्यात आधी आपला सगळा Important Data चा Backup एखाद्या External Hard Disk मध्ये घ्या आणि त्या Hard Disk ला तुमच्या PCs पासून Disconnect करून ठेवा.

√ आपल्या Emails मध्ये कोणत्याही हानिकारक Links वर Click करू नका.

√ Unsafe आणि Untrusted Sites वर जाण्यापासून दूर राहा.

√ कोणत्याही Webpages, Facebook, Messaging Apps वर आलेल्या कोणत्याही Links वर Click करू नका.

√ आपल्या Files चा नेहमी Backup घेतं राहा.

√ Antivirus चा वापर करा आणि System ला Update करत राहा.

√ Windows चा Firewall On ठेवा किंवा कोणत्याही अन्य Firewall चा वापर करा.

      हे हल्ले कधी पर्यंत संपतील हे अजून काही सांगता आलेलं नाही. पण वरील काही steps ना Follow करून तुम्ही तुमचा PCs सुरक्षित करू शकता.
***

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Cyber Crime

सायबर गुन्हे

काय आहे कंप्युटर virus ?