Posts

Showing posts from May 12, 2017

सायबर गुन्हे

Image
‎      अलीकडच्या काळात इंटरनेटवरच्या गुन्ह्यांच्या म्हणजेच सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर धक्कादायक बातम्या वाचायला मिळत असल्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांचे लक्षसुद्धा या प्रकारांकडे वळले आहे. पण यातली मुख्य अडचण म्हणजे नेहमीचे गुन्हे किंवा हल्ले कसे घडतात याविषयी सगळ्यांना कल्पना असते; तशी सायबर विश्वाच्या बाबतीत मात्र ती नसते. म्हणजेच गुन्हेगारांच्या एखाद्या टोळीने बँकेवर हल्ला करणे किंवा एखाद्या दहशतवादी संघटनेने बॉम्बहल्ला घडवून आणणे अशांसारख्या प्रसंगांची माहिती सर्वसामान्य लोकांना असते. पण इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे नक्की घडवता येतात तरी कसे आणि त्यांचे स्वरूप कसे असते हे समजून घेणे मात्र अनेक जणांच्या कुवतीबाहेरचे असते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थातच त्यांना या संदर्भातली अगदी तुटपुंजी माहिती असते आणि शिवाय या सगळ्या प्रकारांमधली गुंतागुंत इतकी क्लिष्ट असते की ती समजून घेणे सहजासहजी शक्य होत नाही. नेमक्या याच गोष्टीचा सायबर गुन्हेगार अनेकदा फायदा उठवतात. आपण प्रथम सायबर गुन्हेगारीविषयी बोलू. याचा फटका अगदी सर्वसामान्