काय आहे कंप्युटर virus ?


     आपण नेहमी बोलत असतो की हे कंप्युटरच जग आहे आणि या कंप्युटर च्या जगात जर तुम्हाला Virus बद्दल माहित नसेल तर तुम्हाला काहीच माहीत नाही. मग चला तर आज आपण  Virus बद्दल थोडं जाणून घेऊया.

काय असतं Virus? 
     ज्या प्रकारे Human Body मध्ये Virus असतात जे आपल्याला आजारी करतात आणि आपली इम्युन सिस्टम ला नुकसान पोहचवतात, त्याच प्रकारे कंप्युटर Viruses देखील कंप्युटर च्या कार्यशैली वर विपरित परिणाम घडवून आणतात. Viral Information Resources Under Seize म्हणजेच Virus एक असा प्रोग्राम आहे जो आपोआप आपल्या कंप्युटर सिस्टम वर install होतो आणि कंप्युटर ला संक्रमित करतो. एक Virus प्रोग्राम User ला कळू हि न देता कंप्युटर ला संक्रमित करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या Malware आणि Adware प्रोग्राम्स च्या संदर्भांत virus शब्दाचा उपयोग वारंवार केला जातो. Virus प्रोग्राम चा प्रमुख उद्देश केवळ कंप्युटर memory मध्ये stored असलेले अंक व इतर सर्व प्रकारच्या माहितीमध्ये बाधा आणणे आणि त्यांना संक्रमित करणे हाच असतो.
कंप्युटर Virus हा खूप छोटा प्रोग्राम असतो परंतु खूप शक्तिशाली असतो. तो कंप्युटर ला आपल्या मानानुसार चालवू शकतो . हे Virus प्रोग्राम्स कोणत्याही सामान्य कंप्युटर मध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या उद्देशानुसार कंप्युटर मधून सगळा Data आणि Files नष्ट करतात किंवा Corrupt करतात. Virus च्या प्रवेशानंतर कंप्युटर च्या कार्यात खूप बाधा येतात, त्याची काम करण्याची गती कमी होते, कामात चुका होतात आणि अनेक समस्या समोर येतात. सगळ्या प्रकारचे Virus प्रोग्राम्स मुख्यतः  Assembly Language किंवा इतर High Level Language म्हणजेच Pascal किंवा C सारख्या Languages मध्ये बनवले जातात.
Virus हा प्रोग्राम देखील इतर प्रोग्राम सारखाच असतो. पण Virus प्रोग्राम हा आपोआप Copy होत असतो आणि त्याचमुळे हा Virus एका कंप्युटर मधून इतर कंप्युटर मध्ये पसरला जातो. Mostly Virus जे असतं ते बहुतेक वेळा Pen Drives, Floppy Disks, CDs आणि इतर माध्यमातुन दुसऱ्या कंप्युटर मध्ये पसरला जातो.

कसं थांबवणार Virus ला ?
     या प्रकारच्या Virus ना थांबवण्यासाठी आपल्या कंप्युटर मध्ये Antivirus असणे आवश्यक आहे. पण कोणत्याही प्रकारचा Antivirus सगळ्या प्रकारच्या Virus पासून आपल्या कंप्युटर ला सुरक्षा नाही देऊ शकत. पण जर तुम्ही खूप वेळ Internet चा वापर करत असाल तर कोणत्याही Antivirus चा Paid Version चा वापर करू शकता. त्यामुळे कोणतंही नवीन Virus आपल्या कंप्युटर वर आल्यास आपल्याला Update मिळतो, आणि त्यामुळे खूप easily तुम्ही त्या Virus पासून कंप्युटर ला सुरक्षित करू शकता. पण जर तुम्ही Internet चा जास्त वापर करत नसाल तर तुम्ही कोणताही Free Version चा Antivirus वापरू शकता.
   काही Popular Antivirus च्या links खाली दिल्या आहेत. त्यामध्ये जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता.


***

-Mahesh Ghodvinde

Comments

Popular posts from this blog

Cyber Crime

काय आहे WannaCry Ransomware ?